पॅरिस फॅशन वीकमधून परतल्यानंतर ऐश्वर्या राय पुन्हा IIFA Awards साठी रवाना झाली आहे.
आराध्या नेहमी तिच्या आईसोबत आंतरराष्ट्रीय ट्रीपला जात असते. काही दिवसांपूर्वी SIIMA अवॉर्ड्समध्ये ऐश्वर्यासोबत आराध्या दिसली होती.
नुकतीच आराध्या तिच्या आईसोबत IIFA Awards साठी गेली आहे.
आराध्याला सतत आईसोबत पाहून चाहत्यांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
चाहते म्हणत आहेत की, आराध्या शाळेत जात नाही का? किंवा शाळेतील शिक्षक तिला काही बोलत नाहीत का?
यावर एका मुलाखतीत ऐश्वर्या रॉयने म्हटलं होते की, शाळेची आठवण ठेवून ती प्रवासाची पूर्ण योजना आखते.