एखादा कलाकार एखाद्या दौऱ्यामधून किती कमाई करु शकतो? काही शे कोटी रुपये बरोबर ना?
मात्र एका गायिकेने तिच्या दौऱ्यांमधून चक्क 170000000000 रुपये कमवले आहेत. ही कोण आहे पाहूयात...
प्रसिद्ध इंग्रजी पार्श्वगायिका टेलर स्विफ्टने एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
टेलर स्विफ्टने एकाच दौऱ्यातून 207 कोटी 76 लाख 18 हजार 725 अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे.
विशेष म्हणजे टेलर स्विफ्टच्या कमाईचा हा आकडा केवळ तिकीट विक्रीचा आहे.
भारतीय चलनानुसार टेलर स्विफ्टने केलेली ही रक्कम 17 हजार कोटी रुपये इतकी होते.
टेलर स्विफ्टची प्रोडक्शन कंपनी 'टेलर स्विफ्ट टुरिंग'ने या कमाईच्या वृत्ताला 'न्यू यॉर्क टाइम्स'शी बोलताना दुजोरा दिला आहे.
कोणत्याही कॉन्सर्टमध्ये तिकीट विक्रीतून झालेल्या कमाईची ही दुप्पट रक्कम आहे, असं टेलर स्विफ्टच्या कंपनीने म्हटलं आहे.
टेलर स्विफ्टची ही कॉन्सर्ट ट्रीप जवळपास 20 महिने म्हणजेच दीड वर्षांहून अधिक काळ सुरु होती.
सर्वाधिक कमाई करणारी म्युझिक टूअर म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही टेलर स्विफ्टच्या या दौऱ्याची दखल घेतली आहे.