माधुरी Office Rent मधून किती पैसा कमवते? महिन्याचं भाडं तुमच्या 6 महिन्यांच्या Salary पेक्षाही जास्त

Swapnil Ghangale
Dec 19,2024

चिरतरुण अभिनेत्री

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही चिरतरुण अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

रिअल इस्टेटमधूनही कमाई

माधुरी दीक्षित अभिनयाबरोबरच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमधूनही कमाई करते.

स्वत:च्या मालकीची कार्यालयीन जागा...

माधुरी दीक्षितने तिच्या मालकीची एक ऑफिस स्पेस म्हणजेच कार्यालयीन जागा भाडेतत्वावर दिल्याचं वृत्त आहे.

धक्का बसल्याशिवाय राहणार नाही

भाडेतत्वावर माधुरीने दिलेल्या मुंबईमधील या कार्यालयाचं एका महिन्याचं भाडं पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

भाडेतत्वावर दिली जागा

अंधेरी पश्चिममधील ही कार्यालयीन जागा माधुरीने एका खासगी कंपनीला भाडेतत्वावर दिली आहे.

ऑफिसचा आकार केवढा?

माधुरीच्या मालकीची ही ऑफिस स्पेस 1 हजार 594.24 स्वेअर फूटांची आहे.

महिन्याचं भाडं किती?

माधुरी या जागेसाठी खासगी कंपनीकडून भाडं म्हणून तब्बल 3 लाख रुपये दर महिन्याला घेणार आहे.

अर्ध्या वर्षाचा पगार

अनेकांसाठी माधुरी एका महिन्यासाठी आकारत असलेली ही रक्कम म्हणजे अर्ध्या वर्षाचा पगार झाला.

VIEW ALL

Read Next Story