मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते.

यानंतर अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात झळकली. विशेष म्हणजे ती या पर्वाची रनरअप ठरली होती.

सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत तिने खलनायिकेचे पात्र साकारले आहे.

आता अपूर्वाने होळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

अपूर्वाने स्टार प्रवाह आयोजित 'रंगोत्सव' कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती.

"मत्सर, द्वेष, मतभेद विसरू, प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू… अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली होळी रे…होळीच्या हार्दिक शुभेच्छा", असे कॅप्शन देत तिने सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अपूर्वाने रंगांची उधळण केल्याचेही पाहायला मिळत आहे.

VIEW ALL

Read Next Story