'या' आहेत सध्याच्या घडीच्या Bollywood मधील Top 4 अभिनेत्री; 2 नावांनी थक्क व्हाल

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

बॉलिवूडचा दमदार कमबॅक

कोरोनाच्या फटक्यानंतर बॉलिवूडची गाडी पुन्हा एकदा पटरीवर खऱ्या अर्थाने आली ती 2023 मध्ये.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

या चित्रपटांनी वर्ष गाजवलं

'जवान', 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी', 'जेलर', 'पठाण', 'अॅनिमल' आणि 'गदर-2' सारख्या दमदार चित्रपटांनी 2023 चं वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

शाहरुख सर्वात यशस्वी

2023 मध्ये शाहरुख खान पुन्हा एकदा वर्षभरातील सर्वाधिक सुपरहीट आणि सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

4 अभिनेत्रीच छाप सोडू शकल्या

मात्र अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तरी ढीगाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही केवळ 4 अभिनेत्रीच आपली छाप सोडू शकल्या. या चौघी कोण ते पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

भूमिका चांगलीच लक्षात राहिली

आलिया भट्टसाठी 2023 चं वर्ष चांगलं गेलं. 'गंगुबाई काढीयावाडी' चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच लक्षात राहिली.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

ओटीटीवरही दबदबा

त्यानंतर आलिया भट्टचा 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' ही बॉक्सऑफिसवर चांगलाच गाजला. आलियाचे ओटीटी चित्रपटही चांगलेच चर्चेत राहिले.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

सलग 2 सुपरहीट चित्रपट

2023 मध्ये आलिया खालोखाल दीपिका पादुकोणनेही सलग 2 सुपरहीट चित्रपट दिले. तिला 'पठाण' आणि 'जवान'मध्ये चांगली पसंती मिळाली.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

'छपक' आपटला

मात्र दीपिकाचा 'छपक' चित्रपट तिकीटबारीवर चांगलाच आपटला. इथेच आलिया तिच्यापेक्षा सरस ठरली.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

'कबीर सिंग'पासून नॉन स्टॉप

अभिनेत्री किआरा अडवाणीला 'कबीर सिंग' चित्रपटापासून अच्छे दिन आले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

यंदा कोणचे चित्रपट आले

किआराचे 'शेरशाहा', 'भूल भुल्लैया-2', 'जूग जूग जियो' आणि 'सत्यप्रेम की कथा' हे चित्रपटही या वर्षी प्रदर्शित झाले.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

हे चित्रपट ठरणार सुपरहीट

किआराचे 'गेम चेंजर' आणि 'वॉर-2' चित्रपट आगामी वर्षात तिला यश मिळवून देईल असं म्हटलं जात आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

अव्वल चारमध्ये श्रद्धाही

अव्वल 4 अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूर असण्याचं कारण म्हणजे ती फार मोजके चित्रपट करते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

उत्तम अभिनेत्री पण...

श्रद्धा एक उत्तम अभिनेत्री असली तरी ती अगदीच हातावर मोजण्याइतक्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

खणखणीत कामगिरी करणार श्रद्धा

'तू झुटी मै मक्कार' चित्रपटामध्ये श्रद्धा रणबीरबरोबर झळकली होती. तिचा 'स्री-2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर खणखणीत कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

या ही ठरल्या यशस्वी

या चौघींबरोबर कटरिना कैफ, करिना कपूर खान, क्रृती सेनॉन आणि दशा पटाणींच्या वाट्यालाही मोजकं यश आलं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 12, 2024

VIEW ALL

Read Next Story