प्राजक्तानं अलीकडेच कर्जत येथे फार्महाऊस खरेदी करत तिचे स्वप्न पूर्ण केले.
तिचं हे फार्महाऊस पर्यटकांना भाड्याने देण्याची तिची योजना आहे.
प्राजक्ताच्या या आलिशान फार्महाऊसमध्ये 3 बेडरूम्स, हॉल, किचन आणि स्विमिंगपूल आहे.
या फार्महाऊसमध्ये 15 पेक्षा जास्त लोक एकाच वेळी राहू शकतात. दोन लोकांना एका रात्रीसाठी रहायंच असेल तर 20 हजार 250 रुपये द्यावे लागतील. जेवणाचा खर्च वेगळा आहे.
जेवणासाठी प्रति व्यक्ती 600 रुपये द्यावे लागतील. यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश होतो.
फार्महाऊसमध्ये स्वयंपाकासाठी ओव्हन आणि गॅससारख्या सुविधा उपलब्ध आहेत. पण येणाऱ्या पाहुण्यांना स्वत: जेवण बनवता येणार नाही. हॉटेलमधून मागवलेलं जेवण गरम करता येईल.
फार्महाऊसमध्ये पाळीव प्राण्यांना परवानगी नाही. (All Photo Credit : stayleisurely.com)