'फुलवंती' फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी नेहमी तिच्या हटके लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते.
अशातच आता तिच्या नवीन कलरफुल लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि कलरफुल स्कर्ट परिधान केला आहे.
या फोटोमध्ये तिने हातात चप्पल घेऊन फोटोशूट केलं आहे. फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.