9 महिन्यांच्या गर्भधारणेनंतर गरोदर महिला बाळाला जन्म देतात. या काळात सहसा त्रासदायक प्रवास करणं महिला टाळतात.
भारतात 7 महिने किंवा त्याहून अधिक काळ गरोदर असणाऱ्या महिलांना विमानप्रवासाची परवानगी नसते. पण, काही प्रसंग इथं अपवाद ठरतात.
अशा वेळी विमानप्रवासादरम्यानच एखाद्या महिलेनं बाळाला जन्म दिला तर त्यावेळी जर हा आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर देशाची सीमा निश्चित केली जाते आणि त्याच देशाचं नाव मुलाच्या जन्माच्या दाखल्यात नमूद केलं जातं.
विमान लँड झाल्यानंतर संबंधित विमानतळ व्यवस्थापनाकडून बाळाच्या जन्माचा दाखल्यासंबंधी माहिती दिली जाते.
विमानप्रवासात जन्मलेल्या बाळाकडे एक असा अधिकार असतो, की ज्या देशात त्याचा जन्म होतो त्या देशाचं नागरीकत्वं या बाळाला मिळू शकतं.
थोडक्यात विमानप्रवासात जन्मलेल्या बाळाला दुहेरी नागरिकत्वाचीही संधी असते.