बहुचर्चित 'पुष्पा : द रुल' हा 'पुष्पा' चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून सगळीकडे केवळ याच भागाची चर्चा आहे.
सोशल मीडियावर अनेक चाहते चित्रपटगृहांमधील फोटो पोस्ट करत असून चित्रपटांमधील सीन काय आहेत याची झलक दाखवत आहेत. यामध्ये चित्रपटातील काही इंटिमेट सिन्स समोर आलेत.
रश्मिका आणि अल्लू अर्जुनमधील केमिस्ट्री पाहून सारेच चाहते थक्क झाले असून दोघांमधील काही ऑनस्क्रीन खास सीन चर्चेत आहेत.
रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा एक लिपलॉक सीनही चित्रपटात आहे.
पुष्पराज आणि श्रीवल्लीमधील इंटिमेट गाणंही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असले तरी काहींनी या गाण्याला व्हल्गर म्हटलं आहे.
मात्र या गाण्यातील रश्मिकाच्या स्टेप्स फारच टुकार असून तिला मुद्दाम अंगप्रदर्शन करणारे कपडे देण्यात आल्याची टीका अनेकांनी केली आहे.
चित्रपटाचा पहिला भाग असलेल्या 'पुष्पा : द राइज'ने बक्कळ कमाई केली होती. आता 'पुष्पा : द रुल' अनेक विक्रम मोडेल असं सांगितलं जात आहे.
'पुष्पा : द रुल'मध्ये फहाद फासिलच व्हिलनच्या भूमिकेत असून 'पुष्पा 3'ची घोषणाही करण्यात आली आहे. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)