सत्यजित रे यांचा 2 मे 1921 रोजी कोलकाता येथे झाला. सत्यजित रे हे नाव नसून एक संस्थान आहे. सिनेमा प्रेमींवर सत्यजित रे यांची छाप आहे.
सिनेमा आणि कला क्षेत्रातील त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. सत्यजित रे यांचं बालपण अतिशय संघर्ष आणि संकटांनी भरलेलं होतं.
कॉलेजमधून अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर सत्यजित रे पुढील शिक्षणासाठी शांतीनिकेतनला गेले आणि पुढील पाच वर्षे तिथे राहिले.
1928 मध्ये प्रसिद्ध झालेल्या विभूतिभूषण बंधोपाध्याय यांच्या ‘पाथेर पांचाली’ या प्रसिद्ध कादंबरीची बाल आवृत्ती तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सत्यजित रे यांनी आपल्या जीवनात 37 सिनेमांचं दिग्दर्शन केलं. ज्यामध्ये फिचर सिनेमे, वृत्त चित्र आणि लघु सिनेमांचा समावेश आहे.
"पाथेर पांचाली" ला कान्स चित्रपट महोत्सवात "सर्वोत्कृष्ट मानवतावादी दस्तऐवज" पुरस्कारासह एकूण अकरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
भारत सरकारकडून त्यांना सिनेमा क्षेत्रातील कामगिरीबद्दल 32 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केलेले सत्यजित रे हे दुसरे चित्रपट निर्माते होते.
1985 मध्ये त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1992 मध्ये त्यांना भारतरत्न आणि ऑस्कर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
23 एप्रिल 1992 रोजी सत्यजित रे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्येच त्यांचे निधन झाले.