के.केला कधीही विसरणार नाही.

लोकप्रिय गायक के.के. आपल्या आवाजासाठी आणि सुरांसाठी आजही ओळखला जातो.

के.केच्या आठवणी ताज्या

आज त्याची पहिली पुण्यतिथी आहे. 31 मे 2022 रोजी त्यानं या जगाचा निरोप घेतला.

आज के.केला जाऊन एक वर्ष पुर्ण

आज एक वर्ष पुर्ण झालं असलं तरी मात्र त्याच्या चाहत्यांचा आजही यावर विश्वास बसत नाहीये.

विविध भाषांमध्ये गायली गाणी

के.के.नं फक्त हिंदीच नाही तर तामिळ, बंगाली, मराठी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

मराठीतला डेब्यू

के.केनं 'वेड गे लागले' हे 'फ्रेंडशिप डॉट कॉम' या मराठी चित्रपटातील गाणं गायलं होतं. त्याचा याद्वारे मराठीत डेब्यू झाला होता.

दोन महिन्यांपुर्वी एक मराठी गाणं रेकॉर्ड

परंतु तुम्हाला माहितीये का की, के.के.नं आपल्या मृत्यूच्या दोन महिन्यांपुर्वी एक मराठी गाणं रेकॉर्ड केलं होतं.

'या' चित्रपटातील गाणं केलं रेकॉर्ड

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'एब्रेला' या चित्रपटातील गाणं रेकॉर्ड केलं होतं. ज्याची गाणी संगीतकार संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली होती.

मराठी गाणी आणि के.के.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की, ''आम्ही 'एकांत हवा' हे गाणं के.के यांच्या मृत्यूच्या अगोदर रेकॉर्ड केले होते. तेव्हा ते सगळीकडेच इतके बिझी होते परंतु...

ते गाणं आणि आठवणी

आम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की त्यांनी आमच्यासाठी या गाण्यासाठी वेळ दिला आणि ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी तयार झाले.'' ते पुढे म्हणाले की, ''मी त्यांच्याशी संपर्कात होतो जेव्हा मी पियानिस्ट म्हणून त्यांच्या काही कॉन्सर्ट्मध्ये होतो.''

मराठी संगीताबद्दलही प्रेम

''ते एक अत्यंत प्रतिभाशाली होते सोबतच त्यांना मराठी चित्रपटाबद्दल अतोनात प्रेम होते. त्याचबरोबर ते मराठी संगीताबद्दलही प्रेमानं बोलत असतं.''

VIEW ALL

Read Next Story