भारतात 5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकप स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी आता चाहतेही सज्ज झाले आहेत.
दरम्यान 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात येणाऱ्या एलईडी स्टंपची किंमत तुम्हाला माहितीये का?
एलईडी लाईट्स आणि मायक्रोफोन असलेल्या स्टंपची किंमत जास्त आहे.
वर्ल्डकप 2023 मध्ये वापरण्यात येणाऱ्या एलईडी स्टंपच्या सेटची किंमत 50 हजार डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच 41 लाख रुपये असू शकते.
कॅमेरे आणि रिंग बेल्ससह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एलईडी स्टंपच्या सेटची किंमत 50 हजार डॉलर्सपर्यंत असते.
वर्ल्ड कप 2023 मध्ये वापरलेल्या एलईडी स्टंपच्या एका सेटची किंमत 41 लाख रुपये तर दोन्ही सेटची किंमत 82 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचं म्हणजे एका सामन्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंना 78 लाख रूपये मिळतात. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये वापरले जाणारे स्टंप्स हे खेळाडूंच्या फी पेक्षा महाग असणार आहेत.