'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ शर्टची 2 बटणं कायम उघडी का ठेवायचे ठाऊक आहे का?

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

कौतुकाचा वर्षाव

आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला, विनोदी भूमिका सादर करताना आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

अनेक चित्रपट गाजले

मागील अनेक दशकांपासून मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरचे अनेक चित्रपट गाजवले.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

2 बटणं उघडी ठेवण्याची स्टाइल

मात्र आपल्या भूमिकांबरोबरच अशोक सराफ यांची शर्टाची वरची 2 बटणं उघडी ठेवण्याची स्टाइलही 1990 च्या दशकामध्ये चांगलीच गाजली.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

अनेक चित्रपटांमध्ये दिसला हा लूक

अशोक सराफ यांचा हा लूक ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘गंमत जंमत’, ‘फेका फेकी’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून दिसून आलेला.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

वरची 2 बटणं उघडी का ठेवायचे?

पण अशोक सराफ हे शर्टाची वरची 2 बटणं उघडी का ठेवायचे? यासंदर्भातील रंजक कारण त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. 2 बटणं तुम्ही उघडी का ठेवायचे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

पूर्वीच्या काळी बटण असणारी शर्टच अधिक वापरली जायची. कॉलरपर्यंत बटणं पुर्ण लावल्यावर फार उकडायचे आणि त्यामुळे अशोक सराफ मुद्दाम वरची दोन बटणं उघडी ठेवायचे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

अभिनय गळ्याशी यायचा

"शर्टाचे पहिले बटण बंद केले तर सगळा अभिनय माझ्या गळ्याशी यायचा. म्हणून मी उघडं ठेवायचो," असं मजेदार उत्तर अशोक सराफ यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

अशोक मामांनी दिलं मजेशीर उत्तर

"काही वर्षे मी स्टाइल म्हणून शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवली होती आणि त्यावेळी ती स्टाइल देखील होती," असे मजेशीर उत्तर अशोक सराफ यांनी दिलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 31, 2024

VIEW ALL

Read Next Story