पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम यांचे मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
मालदीव हा देश सुंदर समुद्र किनाऱ्यांची वेढलेला असून अनेक बॉलिवूड स्टार्स येथे जाण पसंत करतात. त्यामुळे मालदीव हे एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण बनलं आहे.
सोनाक्षी सिन्हा, वरून धवन, परिणीती चोप्रा, हिना खान, मोनी रॉय, तारा सुतारीया अशा अनेक सेलिब्रिटींनी मालदीवच्या शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
तेव्हा असा प्रश्न पडतो कि मालदीवमध्ये असं नेमकं काय आहे ज्यामुळे बॉलिवूड स्टार्स येथे जाण जास्त पसंत करतात.
मालदीव आपल्या सुंदर, अलिशान, प्रायव्हेट रिसॉर्टसाठी ओळखला जातो. जे गोपनीयतेची देखील काळजी घेतात.
कमी गर्दी, शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून मालदीव हे बॉलिवूड स्टार्सच्या आवडीचं ठिकाण बनलं आहे.
मुंबई येथून मालदीवची राजधानी माली इथपर्यंत थेट फ्लाईट उपलब्ध असल्याने प्रवासाच्या दृष्टीने देखील हे सोपं आहे.
मालदीव फिरण्यासाठी उत्सुक पर्यटकांना आधीपासून मालदीवचा व्हिजा काढण्याची गरज नसते. थेट तेथे जाऊनही व्हिजा काढता येतो.
मालदीव हे एक रोमँटिक ड्रीम आयलँड असून समुद्राचं निळशार पाणी आणि पांढरी वाळू आणि समुद्राच्या किनारी पाण्यात बांधलेलं रिसॉर्ट हे मालदीवचे खास आकर्षण आहे.