संध्याकाळी पैसे, हळद, मीठ, दही इत्यादी दान करू नये. एखाद्याला दान किंवा उधार दिले तर देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते.
कोणत्याही व्यक्तीने सूर्यास्ताच्या वेळी घराच्या आत किंवा बाहेर झोपू नये. असं केल्यास लक्ष्मी नाराज होते. आर्थिक समस्या जाणवते.
शास्त्रानुसार झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सूर्यास्तानंतर घर झाडणे किंवा पुसल्यामुळे तुम्हाला पैसे आणि आरोग्य दोन्हीचे नुकसान सहन करावे लागेल.
संध्याकाळनंतर चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. तुळशीची पाने तोडल्यास वास्तू दोष आणि तुमच्या आयुष्यातील आनंद नष्ट होतो.
सूर्योदयानंतर खोलीचे दरवाजे बंद ठेवू नयेत. माता लक्ष्मीसह देवी-देवतांच्या आगमनाचा हा काळ ही चुक करु नये. अन्यथा तुमच्या आयुष्यातही अंधार येतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)