यशने आधी 19 चित्रपटांमध्ये काम केलं, पण 'या' एकाच चित्रपटाने पालटले नशीब

Jan 08,2025


कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', अभिनेता यश आज 8 जानेवारीला त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे.


1986 मध्ये कर्नाटकातील हासन गावात यशचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याने अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.


यशचे मुळ नाव 'नवीन कुमार गौडा' आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यावर त्याने स्वतःचं नाव बदलून 'यश' ठेवलं.


2000 मध्ये यशने टी. व्ही. जगतात पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्याने उतरन, शिवा, नंदा गोकुल या मालिकांमध्ये अभिनय केला.


तब्बल 7 वर्षांनंतर यशने सिनेसृष्टीत अभिनय करण्याचा निर्णय घेतला.


अभिनेता यशचे नशीब 19 चित्रपटांनंतर पालटले. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या KGF चित्रपटाला भरभरून लोकप्रियता मिळाली.


फक्त 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या KGF चित्रपटाने जगभरात 238 कोटींची जोरदार कमाई केली.

VIEW ALL

Read Next Story