भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक नात्यात 4 वर्षांनंतर काही मतभेद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.
चहल आणि धनश्रीनं एकमेकांना अनफॉलो केल्यानं या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. पण, तुम्हाला माहितीये का, धनश्रीआधी हा खेळाडू कोणावर भाळला होता?
रिपोर्ट्सनुसार युझी तनिष्का कपूर नावाच्या एका तरुणीला डेट करत होता. धनश्रीसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी युझीला अनेकदा त्या मुलीसोबत पाहिलं गेलं होतं.
तनिष्का आणि युझवेंद्रचं नातं फार काळ टीकलं नाही. ज्यानंतर त्याच्या आयुष्याचत धनश्रीची एंट्री झाली.
2022 मध्ये धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला वेगळं नाव दिलं.
आता मात्र ही जोडी विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या चर्चांना धनश्री किंवा युझीपैकी कोणीही दुगोरा दिलेला नाही.