वयाच्या 22 व्या वर्षी युट्यूब क्षेत्रामध्ये पदार्पण करत या माध्यमाचा प्रभावी वापर करणारी व्यक्ती म्हणजे रणवीर अल्लाहबादिया.
BeerBiceps या त्याच्या चॅनलनं कमालीची लोकप्रियता मिळवली असली तरीही सध्या मात्र याच रणवीरचं टेन्शन वाढलं ते म्हणजे त्याच्या चॅनल हॅक प्रकरणामुळं.
रणवीरचे 7 युट्यूब चॅनल असून, त्याच्या फॉलोअर्सचा आकडा आहे 12 मिलियन. फिटनेस, राजकारण, इतिहास आणि अध्यात्म अशा विविध विषयांवर तो पॉडकास्ट व्हिडीओ बनवतो.
मीडिया रिपोर्टनुसार रणवीर अल्लाहबादियाची कमाई कोट्यवधींमध्ये असून, त्याची एकूण संपत्ती आहे 60 कोटी रुपये.
रणवीर भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबरपैकी एक असून, त्यानं धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवाय त्यानं इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात पदवी शिक्षणही घेतलं आहे.
2018 मध्ये रणवीरनं 'द रणवीर शो' सुरु केला होता. आतापर्यंत त्याच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.