100 ग्रॅम पनीर की 100 ग्रॅम चिकन, कशामध्ये असतात जास्त प्रोटीन?

तेजश्री गायकवाड
Nov 08,2024

प्रोटीन का महत्त्वाचे आहेत ?

केस, डोळे, स्नायू आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. प्रोटीन आपल्या शरीराला योग्यरित्या काम करण्यासाठी आवश्यक आहे.

चिकन की पनीर

बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की चिकन की पनीर, कशामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतात?

तज्ञांचे मत

ज्येष्ठ आहारतज्ञ पायल शर्मा म्हणतात की पनीर हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा समृद्ध स्रोत आहे. त्याचबरोबर मांसाहार करणाऱ्यांनी प्रोटीनसाठी चिकन खावे.

100 ग्रॅम पनीर

आहारतज्ञ म्हणतात की 100 ग्रॅम पनीरमध्ये 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन आढळतात. जे लोक व्हेज खातात त्यांच्यासाठी पनीर हा सर्वोत्तम पर्याय आहे.

100 ग्रॅम चिकन

परंतु 100 ग्रॅम चिकनमध्ये 24 ते 30 ग्रॅम प्रोटीनचे प्रमाण आढळते. चिकनमध्ये जास्त प्रोटीन असतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story