हवामान बदलले की त्याचा त्वचेवर खोलवर परिणाम होतो.
त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो
खोबरेल तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे दररोज आंघोळीनंतर त्वचेला खोबरेल तेल लावा.
कोरफडीचे जेल त्वचेला थंड करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. हे जेल थेट त्वचेवर लावा.
दही हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. फेस मास्क म्हणून दही वापरा.
हळद पावडर दही किंवा दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. 15-20 मिनिटांनी धुवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)