रोज एकाचं प्रकाराच्या भाज्या खाऊन कंटाळला असाला तर ही दही-बटाट्याची मसालेदार भाजी खाऊन बघा, एकदा ही भाजी खाल्ली तर वारंवार बनवाल.

Intern
Nov 26,2024


बाजारात मिळणाऱ्या त्याच त्या भाज्या खाऊन अनेक वेळा कंटाळा येतो. हिवाळ्यात काहीतरी चटपटीत खावेसे वाटत आहे.


अशातच तुम्ही दही बटाट्याची चविष्ट भाजी बनवून खाऊ शकता. ही भाजी चविष्ट असून आरोग्यास फायदेशीर आहे.


ही भाजी बनवण्यासाठी दही, बटाटा, तूप, काजू पावडर, आलं, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ या साहित्याची आवश्यकता आहे.


बटाट्याला कुकरमध्ये उकडून त्याचे बारीक तुकडे कापून घ्यावे.


त्यानंतर एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात लाल मिरची पावडर, मीठ, काजू पावडर घालून चांगले फेटून घ्या.


आता एका कढईमध्ये तूप आणि जिरे घालून छान परतून घ्या. मग त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून शिजवावे. हे शिजल्यावर त्यात कापलेला उकडलेला बटाटा घालावा.


बटाटा चांगला परतल्यावर त्यात दह्याची पेस्ट घालावी. जेवढा रसा हवा त्यानुसार पाणी घालून थोडं शिजवू घ्या. त्यानंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

VIEW ALL

Read Next Story