प्रेम आणि स्थापत्यशास्त्राचे प्रतिक मानला जाणारा ताजमहल मुघल बादशाह शहाजहॉंने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीसाठी बांधला.
याला 1983 मध्ये यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळाले. ताजमहल संदर्भात अनेक कहाण्या प्रचलित आहेत.
ताजमहल बनवणाऱ्या कारागीरस मजूरासंदर्भातील कहाणी तुम्ही कधी ना कधी ऐकली असेल.
ताजमहलसारखी दुसरी वास्तू बनू नये यासाठी बनवणाऱ्या मजदूरांचे हात कापण्यात आले होते, अशी कहाणी सांगितली जाते.
1632 ते 1648 वर्षात ताजमहल बांधण्यात आला. याच्या भींतीवर छान नक्षी आहेत.
यासाठी देशभरातून वास्तूशिल्प साकारणारे आणि इतर मजूर आग्रा येथे बोलवण्यात आले. त्यांनी ही सुंदर इमारत उभी केली.
भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण (एएसआय) प्लेच इंडिया फाऊंडेशनने 20 हजार कारागीरांचे हात कापलेल्या कहाणीची सत्यता सांगितली आहे.
एएसआयच्या मते, ताजमहल बनवणाऱ्या कारागिरांचे हात कापण्यात आले नव्हते तर त्यांना खूप मोठी रक्कम देण्यात आली.
इतके पैसे मिळाल्यानंतर कारागिरांना काम करण्याची गरज लागली नाही. यासोबतच त्यांना ताजमहलजवळ (ताजगंज) जमिन देण्यात आली.