युगांडाच्या मरियम नबाटांजीने 42 मुलांना जन्म दिलाय.
त्यांना झालेली मुलं ही जुळी, तिळी अशीच आहेत. फक्त एकदाच त्यांनी एकावेळी एका बाळाला जन्म दिला.
मरियमच्या 6 मुलांचा मृत्यू झालाय. तसेच तिचा पती तिला सोडून पैसे घेऊन पळून गेलाय.
आता तिची 38 मुले असून त्यात 20 मुलगे आणि 18 मुली आहेत. सर्वांच पोषण ती एकटीच करते.
मरियम 12 वर्षांची असताना तिच्या परिवाराने लग्न लावून दिले आणि विकले.
13 वर्षाच्या असताना त्यांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला.
ती खूपच फर्टाईल असून तिचे अंडाशय मोठ्या आकाराचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
याला हायपर ओव्यूलेशन म्हणतात. ज्यांचं अंडाशय एका वेळेस खूप अंडी रिलीज करतात.
डॉक्टरांनी तिला पुढे मुलांना जन्म न देण्याची ताकीद दिली आहे.