अश्वगंधा रोज खालल्यास शरीरावर होतील 'हे' परिणाम!

शतकानुशतके, आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतींचे अनेक फायदे विज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत. अश्वगंधा ही वनस्पती महिलांसोबत पुरुषांना सुद्धा अनेक गोष्टीत वरदान ठरत आहे.

अश्वगंधामुळे तणाव दूर होतो, शरीरातील ऊर्जा आणि ताकद वाढते. अश्वगंधाच्या पानात भरपूर प्रमाणात लोह असतं ज्याचा वापर हर्बल चहा तयार करण्यासाठी केला जातो.

सूज आणि ताप आसल्यास अश्वगंधाच्या चहा एनर्जी टॉनिक म्हणून फायदा होतो. अश्वगंधा स्त्रियांना हरवलेली ऊर्जा परत मिळवण्यास, मासिक पाळीत होणारा थकवा कमी करतो.

अश्वगंधाला गप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून सुद्धा आता मान्यता मिळाली आहे. अश्वगंधाचे स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप महत्वाचे ठरते

अश्वगंधा शरीरातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहापासून सरंक्षण करते अश्वगंधा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात सुद्धा मदत करते

अश्वगंधामध्ये ह्रदयाचे विविध आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी मदत होते. अश्वगंधामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूशी संबंधित दुखापतींमध्ये त्याचा उपयोग केला जातो.

कर्करोगासारख्या गंभीर आजारात सुद्धा अश्वगंधाचा उपयोग त्याच्या पेशींच्या वाढीस थांबवण्यात वापरण्यात येते.

वाढत्या वयामुळे पुरुषांमध्ये टेस्टोरॉनचे प्रमाण कमी होऊ शकते अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने पुरुषांच्या टेस्टोरॉनची पातळी सुधारून पुरुषांना लैंगिक समस्या पासून मुक्ती मिळू शकते.

केस गळण्यामागे तणाव हे एक प्रमुख कारण आहे अश्वगंधा तणाव कमी करते, ज्यामुळे केस गळती थांबवते.

वजन वाढवण्यासाठी अश्वगंधाचा फायदा होतो. हे थेट वजन वाढण्यास कारणीभूत नाही, परंतु शरीराच्या कमी वजनाच्या कारणावर ते कार्य करते.

VIEW ALL

Read Next Story