फ्रीजमध्ये ठेवल्यास कणिक सुकते व कडक होते? ही पद्धत वापरुन पाहा

अनेकदा सकाळी पोळ्या करुन झाल्यानंतर उरलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसाठी वापरली जाते.

Mansi kshirsagar
Oct 30,2023


फ्रीजमध्ये ठेवलेली कणीत दुसऱ्या दिवसापर्यंत फ्रेश तर राहते पण कधीकधी ती सुकते व कडक होती. अशावेळी पोळ्या लाटणं कठिण होऊन जाते


तुम्हाला देखील असाच अनुभव येत असेल तर योग्य पद्धतीने कणीक स्टोअर करण्याची पद्धत जाणून घ्या.


भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवताना कधीही डबा किंवा मोठ्या वाटीतच ठेवा.


कणिक फ्रीजमध्ये ठेवण्याआधी त्या भांड्याला थोड तेल लावून त्यावर थोडे पीठ टाका. त्यानंतर कणिकेवरही तेल लावून मगच फ्रीजमध्ये ठेवा.


तेलाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा वापरही करु शकता. पाण्यामुळं तुमचं कणिक थोडं सैलसर होईल


कणिकेच्या पीठाचा गोळा नेहमी एअर टाइट कंटेनरमध्येच स्टोअर करा. जेणेकरुन कणिक नेहमी सॉफ्ट राहील.

VIEW ALL

Read Next Story