इथले 90% लोक खातात मांस! तर सर्वात कमी मांसाहारी लोक 'या' देशात; चक्रावून टाकणारी यादी पाहाच

अनेक देशांत रोज होतो मांसाहार

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांसाहार केला जातो. काही ठिकाणी अगदी किडे-मुंग्याही खाल्ल्या जातात तर काही ठिकाणी घोडा, उंट यासारख्या प्राण्यांची कत्तल करुन त्यांचा भोजनात समावेश केला जातो.

मांसाहारी लोकांचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणारा देश कोणता?

शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचा विचार केल्यास कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला पडणारा प्रश्न म्हणजे, जगातील सर्वाधिक शाकाहारी व्यक्ती कोणत्या देशात आहेत? किंवा सर्वात कमी मांसाहार कोणत्या देशात केला जातो?

सर्वाधिक शाकाहारी लोक कोणत्या देशात?

तुम्हाला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल मात्र मांसाहाराला बगल देऊन केवळ शाकाहारी भोजन स्वीकारणाऱ्या देशांच्या यादीत भारतीय आणि पर्यायाने भारत पहिल्या स्थानी असून लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केल्यास आपल्या देशात शाकाहारी लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

भारतात किती शाकाहारी आणि मांसाहारी?

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 38 टक्के लोक शाकाहारी आहेत. म्हणजेच दर 100 भारतीयांपैकी 38 लोक केवळ शाकाहारी भोजनाला प्राधान्य देतात तर 62 टक्के लोक मांसाहार करतात.

दुसऱ्या क्रमांकावर भारताचा मित्र देश

मांसाहाराचे सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणामही असून इस्रायल हा सर्वात कमी मांस खाणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथले 13 टक्के लोक शाकाहारी आहे.

तिसऱ्या क्रमांकावर हा छोटासा देश

सर्वाधिक शाकाहारी लोक असलेल्या देशांच्या यादीत तैनाव देशाचा तिसरा क्रमांक आहे. इथले 12 टक्के लोक शाकाहारी आहेत.

इथं केवळ 10 टक्के लोक शाकाहारी

'पीयू रिसर्च'च्या अहवालाप्रमाणे इटलीतील केवळ 10 टक्के लोक शाकाहारी आहेत.

या देशात 90 टक्क्याहून अधिक लोक खातात मांस

ऑस्ट्रियामधील 9 टक्के लोकसंख्या शाकाहारी असून या यादीत हा देश पाचव्या स्थानी आहे. या देशात मांस खाणाऱ्यांचं प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे.

या देशात 9 टक्क्यांहूनही कमी शाकाहारी

यादीत सहाव्या स्थानी असलेल्या जर्मनी देशात 9 टक्क्यांहूनही कमी लोकसंख्या शाकाहारी आहे.

VIEW ALL

Read Next Story