जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण

लहान असो वा मोठे आजकाल सर्वच जण केसगळतीमुळे चिंतेत आहेत.पण तुम्हाला अशी काही कारणे माहित आहेत का ज्यामुळे वारंवार केस गळतात.

केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.

केसांची योग्य काळजी न घेतल्याने देखील केसगळतीचा समस्या उद्भवते. बहुतेकवेळा लोक वेळेवर केस धुवत नाहीत त्यामुळे केस गळायला लागतात.

दर आठवड्याला केसांना तेल लावून मसाज करा.केसांची योग्य काळजी घेतल्यास केस गळती कमी होऊ शकते.

काहीवेळी शरीरातील प्रथिने,लोह,व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे देखील केस गळायला लागतात.इतकच नाही तर तणाव किंवा एखाद्या गोष्टीची सतत चिंता देखील केस गळण्याचे कारण बनू शकते.

काही लोकांचे केस हार्मोनलमधील बदलांमुळे गळायला लागतात. जास्त प्रमाणात औषधांचे सेवन करणं केसांवर परिणाम करतं.

जेव्हा तुमचे केस जास्त प्रमाणात गळायला लागतात आणि डोक्यावरील केस पूर्णपणे नाहीसे होतात त्यावेळी गंभीर आजार असण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

हे सर्व टाळण्यासाठी स्वत:ला निरोगी ठेवा, थंड पाण्याने केस धुवा, संतुलित आहार घ्या. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story