Kitchen Recipe: न चिकटणारे, गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत आणि पौष्टिक लाडू, रेसिपी पहा

गव्हाच्या पीठाचे लाडू खूप पौष्टिक असतात. या लाडूमुळं दिवसभराची उर्जा मिळते.

अनेक ड्रायफ्रुड्ट आणि गुळ घालून केलेले हे लाडू चवीलाही छान लागतात

साहित्य

२ वाटी गव्हाचे पीठ, २ वाटी मखाने,१ वाटी किसलेले सुके खोबरे,१५० ग्रॅम डिंक,१/४ वाटी काजु,१/४ वाटी बदाम,१/४ वाटी खरबुज बिया,१ + १/२ वाटी गुळ,सुठ व वेलची पावडर, तुप

कृती

सगळ्यात आधी एका कढाईत तुपातून काजू, बदाम, मखाणा खरबुज बिया भाजून घ्या. त्यानंतर डिंकदेखील चांगलं फुलवून घ्या

त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात सुकं खोबरं भाजून घ्या. त्यानंतर पुन्हा तूपात गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्या

त्यानंतर आता तुपात भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या

आता एका परातीत गव्हाचे पीठ आणि वरील मिश्रण घ्या. त्यानंतर यात वितळलेला गूळ घालून चांगले मिक्स करुन घ्या.

आता हे मिश्रण चांगलं एकजीव करुन लाडू वळायला घ्या

VIEW ALL

Read Next Story