तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता.
हिंग हे सगळ्यांचा घरी उपलब्ध असणारा घटक आहे. एखाद्या पदार्थात हिंग घातले तर त्याची चव खूपच छान लागते.
जर तुम्ही रोज एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायले तर ते आरोग्याला फायदेशीर ठरते
पोटाशी निगडीत कोणत्या समस्या असतील तर रोज हिंगाचे पाणी प्यावे, त्याने पोटाचा त्रास कमी होतो.
पोटात बिघडल्यासारखे होत असेल तर हिंग खावं.
पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर हिंगाचे पाणी प्यावे.
हिंग अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल घटक असतात त्यामुळे शरिरातील इम्यूनिटी मजबूत होते.
महिलांना मासिक पाळीमध्ये पोट दुखत असल्यास हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे. ( Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )