घरात रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो.
पण घरात दिव्यासोबत कोणती वस्तू जाळली जाते त्यामागे वास्तू नियम असतात.
वास्तू नियम पाळल्यास वास्तूदोष दूर होतात.
दिव्यात काळी मिरी टाकून प्रज्वलित केल्यास अनेक फायदे आहेत, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.
कामात सतत अपयश येत असेल तर तुपाच्या दिव्यात काळी मिरी घालून तो प्रज्वलित करावा.
आर्थिक भरभराटीसाठी 5 काळी मिरी टाकून दिवा लावावा. यामुळे पैशाची कमतरता दूर होते.
वाईट नजर लागली असेल आणि वारंवार आजारी पडत असाल तर 5 काळी मिरी स्वत:वरुन 7 वेळा फिरवा. यामुळे नजरदोष दूर होतो.
प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दारावर काळीसोबत दिवा लावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)