ऐन तारुण्यात केस गळण्याची 5 कारणं! अजूनही वेळ गेली नाहीय, टाळा या चुका!

Pravin Dabholkar
Dec 01,2024


तसं तर केस गळणं, टक्कल पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशिष्ठ वयात आल्यावर केस गळती सुरु होते.


पण आजकाल कमी वयात केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलंय.


याची 5 प्रमुख कारणे आहेत. ज्या चुका तुम्ही टाळू शकता.


जास्त ताण घेतल्याने शरिरातील कार्टिसोल पातळी वाढते. जे तुमच्या शरिराच्या हार्मोनसाठी चांगले नसते.


जंक फूड जास्त खाल्लं जातं. यात प्रोटीन कमी असतं. बद्धकोष्ठता वाढते. शरीरात सूज तयार होते. केस गळती सुरु होते.


स्कॅल्प सोरियासिस किंवा जास्त प्रमाणात डॅंड्रफनेदेखील केस गळती होते.


स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये केस गळतीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.


तुम्ही कधी झोपता, किती वेळ झोपता, तुम्ही व्यायाम करताय की नाही? अशी लाइफस्टाइलदेखील केस गळतीला कारणीभूत ठरते.


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story