हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकदा तहान कमी लागते आणि त्यामुळे कमी पाणी प्यायले जाते.
सकाळी कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यामुळे शरीरात जमा हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि शरीर सुद्धा हायड्रेट राहते.
जेवणापूर्वी पाणी प्यायल्यामुळे पोट थोडं भरलेलं वाटतं ज्यामुळे अतिरिक्त भोजन केलं जात नाही.
जेवणाच्या दरम्यान पाणी पिणं टाळावं अन्यथा पचनक्रियेवर परिणाम होतो आणि पचनक्रिया हळू होते.
हिवाळ्यात तहान कमी लागते, तरीही दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी नेहमी घोट घोट करून प्यावे जेणेकरून तहान भागते आणि शरीर हायड्रेट राहते.
हिवाळ्यात कोमट पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. ज्यामुळे शरीराला उब मिळते आणि हायड्रेशन सुद्धा चांगले राहते.
जर तुम्ही हिवाळ्यात व्यायाम करत असाल आणि तुम्हाला जास्त घाम येत असेल तर तुम्ही पाणी पिण्याचे प्रमाण वाढवू शकता.
झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिऊन झोपल्याने शरीरात रात्रभर पाण्याची कमतरता जाणवत नाही. तसेच सकाळी ताजेतवाने वाटते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)