लग्नामध्ये वधू आणि वरादरम्यान 'अंतरपाट' का बरं धरतात?

नेहा चौधरी
Dec 01,2024


काळानुसार आपण बदलत चाललो आहोत आणि हळू हळू अंतरपाटाच महत्व कमी होत चाललं आहे.


नवरा नवरी लग्नाच्या दिवशी, अक्षताच्या आधीच एकमेकांना भेटून photoshoot उरकतात.


लग्नाच्या दिवशी अक्षदा पडण्याआधी वधू-वराला एकमेकांना पाहण्याची परवानगी नसते.


आपल्या विवाहशास्त्रात असं सांगितलंय की, त्या शुभ क्षणी नवरा - नवरीची पहिली नजर मंत्रोच्चारानंतरच होणं पवित्र मानलं जातं.


म्हणूनच जेव्हा मंगलाष्टका चालू असतात तेव्हा वधू आणि वर यांच्यामध्ये अंतरपाट धरलं जातं. त्यावर एक शुभ चिन्ह रेखाटलं असतचं.


मंत्रोच्चाराच्या वेळी वधू - वराची नजर ही या शुभचिन्हाकडे केंद्रित राहते आणि मंगलमय होते.


म्हणूनच लग्नामध्ये अंतरपाटाला अतिशय महत्त्व आहे.


अंतरपाट ही केवळ परंपरा नसून, ती नव्या आयुष्याची सुरुवात पवित्रतेने करण्याचा संदेश देणारी सुंदर प्रथा आहे.

VIEW ALL

Read Next Story