एका संशोधनानुसार, जर तुम्ही वयाच्या चाळीशीनंतर हेल्दी डाएट फॉलो केला तर आयुष्य 10 वर्षांनी वाढेल.

Dec 05,2023

नेचर जर्नल फूडमध्ये प्रसिद्ध संशोधनात सांगितलं की, रिसर्चमध्ये अनहेल्दी फूड खाणाऱ्या 40 जणांनी सहभाग नोंदवला.

यावेळी हेल्दी फूड खाणाऱ्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढलं असल्याचं लक्षात आलं.

रिसर्चनुसार, हेल्दी फूड खाणाऱ्या महिलांचं आयुष्य 10.8 आणि पुरुषांचं वय 10.4 वर्षांनी वाढलं.

तसंच ज्यांनी वयाची 70 वर्षं पूर्ण केल्यानंतर हेल्दी डाएट फॉलो केलं त्यांचं आयुष्य 5 वर्षांनी वाढलं.

आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सहभागी झालेल्यांनी आपल्या जेवणातून अनहेल्दी फॅट्स, साखर आणि मीठ कमी केलं असावं.

त्यांनी फायबर, विटॅमिन आणि मिनरल्स योग्य प्रमाणात घेत आरोग्याची काळजी घेतली असावी.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर आहारात 4 प्रकारच्या पदार्थांचा समावेश करावा.

यामध्ये फळं, भाज्य़ा, मासे, सुका मेवा, बिया आणि कडधान्य यांचा समावेश आहे.

मासे, चिकन, बिया, डाळी आपल्या शरिराला प्रोटीन देतात, जी आरोग्यासाठी चांगली मानली जातात.

VIEW ALL

Read Next Story