जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल. तर ही सवय तुम्हाला रक्तदाबाच्या जोखमीपासून वाचवण्यासाठीच नव्हे, तर हृदयविकार-मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतीचा धोका कमी करण्यासाठीही संजीवनी ठरु शकते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
संतुलित आहारामुळे तुमचे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते. आहारातील सोडियम, साखर आणि अस्वास्थ्यकर चरबीचे प्रमाण कमी करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता.
निरोगी वजन राखणे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. लठ्ठपणाच्या समस्येमुळे उच्च रक्तदाब व्यतिरिक्त मधुमेह आणि इतर अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका होऊ शकतो.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ रक्तदाब पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी लिंबू, संत्री, पालक, टोमॅटो, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.
आहारातील मिठाचे प्रमाण कमी करून रक्तदाब सहज नियंत्रित केला जाऊ शकतो, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.
लहानपणापासून आपल्याला दररोज सकाळी लसणाची कच्ची लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की लसणातील गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी गाजर आणि पालकाच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. यासोबतच बीटरूट, आवळा ज्यूस देखील खूप चांगला मानला जातो.
उच्च रक्तदाब आणि तणाव यांचा थेट संबंध आहे. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव जाणवत असेल, तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. त्यामुळे ताण टाळण्यासाठी रोज व्यायाम, ध्यान, योगासने करा. मित्र आणि कुटुंबासह मजा करा.
सिगारेट आणि अल्कोहोल यांचा थेट उच्च रक्तदाबाशी संबंध आहे. तुम्ही खूप धूम्रपान करत असाल किंवा भरपूर दारू प्यायल्यास, तुम्हाला उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ते पूर्णपणे थांबवण्याऐवजी हळूहळू कमी करा आणि नंतर पूर्णपणे थांबवा.
उच्च रक्तदाबामुळे मेंदू आणि किडनीसह अनेक अवयवांना धोका निर्माण होतो. डॉ. प्रदीप खंडावल्ली एमबीबीएस, डीएनबी जनरल मेडिसिन, हेल्थप्लिक्स यांनी घरगुती उपाय सांगितले आहेत.
आहारातील बदलांसोबतच नियमित व्यायाम आणि रक्तदाबविरोधी औषधांचे पालन करणे आवश्यक आहे.
आज जाणून घ्या उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत. त्याबद्ल आपण जाणून घेणार आहोत.
जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाला हायपरटेन्शन डे असंही म्हणतात.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, तुम्ही औषधांऐवजी इतर घरगुती उपाय देखील करून पाहू शकता.
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चुकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब अधिक गंभीर होतो. पौष्टिक आहाराचा अभाव, धूम्रपान, लठ्ठपणा, ताणतणाव या कारणांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या अधिक असते.