HIV आणि AIDS यांच्यात काय फरक आहे? सर्वात धोकादायक काय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 01,2024

एचआयवी काय आहे?

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉक्टर वीके मोंगा यांच्या माहितीनुसार, एचआयवी एक व्हायरस आहे.


जो शरीरात प्रवेश करुन इम्युन सिस्टम कमकुवत करतो.

एड्स म्हणजे काय?

एड्स एचआयवी व्हायरसच्या संक्रमणाची अंतिम आणि गंभीर अवस्था आहे. यावेळी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

यामध्ये अंतर काय

एचआयवी एक व्हायरस आहे. तर एड्स हा व्हायरसमुळे होणारा आजार असून ती आजाराची शेवटची अवस्था आहे.

एचआयवीच्या सुरुवातीची अवस्था

एचआयवी संक्रमण झाल्ययावर त्या व्यक्तीला लगेच एड्सची लक्षणे दिसत नाही. पण हळू हळू त्याची वाढ होते.

एड्सची सुरुवात कधी होते?

जेव्हा एचआयवी व्हायरस इम्युन सिस्टमला खूप कमकुवत करते. तेव्हा एड्समध्ये त्याच रुपांतर होते.

HIV पासून बचाव

एचआयवीपासून बचावाकरिता सावध असणे गरजेचे आहे. सुरक्षिक शारीरिक संबंध आणि स्वच्छ सुईचा वापर करावा.

HIV वर उपाय

एचआयवीचा संपूर्ण असा उपचार शक्त नाही. पण औषधाने यावर नियंत्रण मिळवू शकतो.

AIDS वर उपाय

एड्सच्या अवस्थेमध्ये व्यक्तीला अधिक काळजी आणि चिकित्सेची गरज असते. पण हा उपाय ठरु शकत नाही.

या दोन्हीचा संबंध

एचआयवी संक्रमित व्यक्तीला एड्स होऊ शकतो. तसेच योग्यपद्धतीने उपचार करुन त्याला थांबवू शकतो.

योग्यवेळी उपचार महत्त्वाचे

एचआयवी संक्रमणची ओळख पटल्यावर त्यावर योग्य उपाय करुन निरोगी जीवन जगू शकते. एड्सपासून बचाव करु शकतो.

VIEW ALL

Read Next Story