अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदी आजपासून जय शाह विराजमान झाले आहेत.
जगभरामध्ये क्रिकेटच्या प्रचार, प्रसार आणि नियमनाचं काम करणाऱ्या या संस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे जय शाह हे पाचवे भारतीय आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवणाऱ्या चार भारतीयांपैकी दोघे महाराष्ट्रातील आहेत. हे दोघे कोण तेच जाणून घेऊयात...
जगमोहन दालमिया हे आयसीसीचे तिसरे अध्यक्ष ठरले. त्यांनी 1997-2000 कालावधीत अध्यक्षपद भूषवलं.
एन श्रीनिवासन यांनी 2014 ते 2015 दरम्यान आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली होती.
महाराष्ट्रामधून क्रिकेटच्या या सर्वोच्च संस्थेचं अध्यक्ष पद भूषवणारं पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे शरद पवार. त्यांनी 2010 ते 2012 दरम्यान हे पद भूषवलं.
प्रसिद्ध वकील असलेले शशांक मनोहर हे मूळचे नागपूरचे असून ते 2015 पासून आतापर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते.