हिंदू धर्मात नवरीला लग्नात हिरवा चुडा भरला जातो.
लग्नाशी निगडीत पहिला विधी म्हणजे साखरपुडा. या दिवशी पहिल्यांदा नवरीला हिरवा चुडा भरतात.
लग्न झाल्यावर महिला हिरवा चुडा हातात भरतात. लग्नानंतर हातात या बांगड्या भरण्याला अधिक महत्त्व आहे.
हिंदू धर्मात हिरव्या चुड्याला अधिक महत्त्व आहे.
हिरवा रंग ताजेपणा, टवटवीतपणा, निसर्ग, सकारात्मकता याचं प्रतिक आहे.
याच सगळ्या गोष्टी लग्नानंतर वधुच्या जीवनात यावा हा यामागचा उद्देश असतो.
तसेच लग्नानंतर त्या स्त्रीचा वाईट नजरेपासून बचाव करावा यासाठी हिरव्या बांगड्या घातल्या जातात.
लग्नानंतर त्या स्त्रीच्या संसारात सुख, समृद्धी नांदावी या उद्देशाने देखील हिरव्या बांगड्या भरल्या जातात.