उष्मा वाढला की, अनेकांनाच काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. अशा वेळी अनेकांच्या आवडीला पर्याय असतो तो म्हणजे ऊसाचा रस.
तुम्हाला माहितीये का, ऊसाचा रसही ठराविक वेळानंतर खराब होतो.
जाणून आश्चर्य वाटेल पण, रस काढल्यानंतर 15 मिनिटांमध्येच तो ऑक्सिजाईज्ड होण्यास सुरुवात होते.
15 ते 20 मिनिटांच्या वर ठेवलेला ऊसाचा रस प्यायल्यास यामुळं विविध प्रकारच्या संसर्गांचा धोका बळावतो.
ऊसाचा रस दीर्घ काळासाठी ठेवल्यास त्यातील पोषक तत्त्वं कमी होऊन तो खराब होण्यास सुरुवात होते.
ऊसाचा रस काढण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं ते अस्वच्छ असल्यासही तो प्यायल्यामुळं संसर्गाचा धोका बळावतो.