लिची आवडते? दिवसभरात किती लिची खाल्ल्यास वजन राहतं नियंत्रणात?

आंब्याशी स्पर्धा

थेट आंब्याशी स्पर्धा असणारी लिचीसुद्धा अनेकांच्याच आवडीचं फळ. लिचीचं फळ सोलून खाल्ल्यानंतर त्याच्या चवीनं चेहऱ्यावर उमटणारा आनंद हा काही औरच. व्हिटामिन C, मॅग्नेशियम, फोलेट आणि इतर अनेक पौष्टिक घटकांचा साठा या इवल्याशा लिचीमध्ये आढळतो.

तंतूमय घटक

पाणी आणि तंतूमय घटकांचा अंश असणारी लिची शरीरावर कमाल परिणाम करते. अशा या लिचीची साधारण 10 ते 12 फळं दिवसभरात खाल्ल्यास त्याचा वजनावर परिणाम होत नाही. थोडक्यात वजन न वाढता ते नियंत्रणातच राहतं.

नैसर्गिक साखर

शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक साखर पुरवण्याचं काम लिची करते. या फळाच्या सेवनामुळं शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. शिवाय त्यातील व्हिटामिन C सुद्धा शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

पचनक्रिया

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी लिची अतिशय फायद्याची ठरते. दर दिवशी लिचीचं सेवन केल्यास बद्धकोष्ठता आणि अतिसार यांसारख्या समस्या दूर होतात.

रोगप्रतिकारक क्षमता

लिचीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळं या फळाच्या सेवनानं शरीलातील रोगप्रतिकारक घटकांमध्ये वाढ होऊन, शरीर आणखी बलशाली होतं. शिवाय त्वचेचं आरोग्यही सुधारतं.

वजनावर नियंत्रण

वाढत्या वजनाच्या चिंतेत असणाऱ्यांसाठी लिची हे फळ आहाराचा भाग असणं अतिशय फायद्याचं ठरतं. लिचीमध्ये कॅलरी आणि फॅट कमी असल्यामुळं भूक भागवून कॅलरीचं प्रमाण कमी ठेवण्यात लिची उत्तम भूमिका बजावते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.आहारातील कोणत्याही बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story