नारळ पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र, एका दिवसात किती नारळ पाणी प्यावे हे प्रत्येकाला माहित असलेच पाहिजे.
जास्त प्रमाणात नारळ पाण्याचे सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. यामुळे प्रमाणात नारळ पाणी गरजेचे आहे.
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. याने संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटते.
जेवणापूर्वी नारळाचे पाणी प्यायल्याेन जबरदस्त फायदा होते. यामुळे पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते.
नारळ पाणी हे एक नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक आहे.यामुळे वर्कआऊट केल्यानंतर नारळ पाणी प्यायल्यास शरीराला त्वरित उर्जा मिळते.
रात्री नारळ पाणी पिण्याचे देखील अनेक फायदे आहे. किडनी स्टोन, ब्लडप्रेशरसह अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
दिवसभरात 1-2 नारळ पाणी प्यावे. याचे प्रमाण साधारण 750 ते 800 मिली इतके असावे.
जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्यास ब्लड प्रेशर, डायरिया, वजन वाढणे तसेच किडनीवरही परिणाम होऊ शकतो.