प्रत्येकाने रोज किमान 3 लिटर पाणी प्यायला हवं, असं सांगितलं जातं. मात्र, आसपासच्या हवामानाचा परिणाम थेट तुमच्या शरिरावर होतो. त्यामुळे पाणी पिण्याच्या मर्यादा देखील वेगवेगळ्या असतात.
व्यक्तीगणिक पाण्याची गरज बदलते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एखाद्याला नेमकी किती पाणी पिण्याची गरज आहे? यानुसार पाणी पिणं गरजेचं आहे.
आपली तहान आसपासच्या वातावरणाशी थेट संबंधित असते. कारण उन्हाळ्यात जास्त तहान लागते तर हिवाळ्यात फारशी तहान लागत नाही.
कामाच्या प्रकाराचा तुमच्या तहानवरही परिणामकारक असतो. उन्हात काम करणाऱ्यांनी पाणी पिण्याच्याबाबतीत हलगरजीपणा करू नये.
लहान मुलांना पाण्याची जास्त गरज असते. वयानुसार पाण्याची गरज तुलनेने कमी भासते.
हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता.
तुम्ही हिवाळ्यात थंड पाणी पिऊ शकत नाही. मात्र, त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. तर तुम्ही कोमट पाणी देखील पिऊ शकता.