अन्नाचं योग्य पद्धतीने अन्नाचं पचन न झाल्याने या तक्रारी समोर येतात. याला आपण अपचन असं म्हणतो.
तुमच्या शरीरात अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होत नसल्यास ही लक्षणं दिसून येतात.
अपचनामुळे शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूया.
कधीकधी जेवल्यानंतर पोट जड झाल्यासारखं वाटत राहतं. मुळात हे अपचनाचं लक्षण आहे.
तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात जळजळ होण्याची समस्या जाणवत असेल तर हे देखील अपचनाचं लक्षण मानलं जातं.
ढेकर देणं किंवा गॅस होणं हे नैसर्गिक आणि सामान्य मानलं जातं. परंतु ज्यावेळी हा त्रास वारंवार होतो तेव्हा पचन प्रक्रियेतील बिघाडाचं हे एक लक्षणं असू शकतं.