जापनीस लोक आपले तंत्रज्ञान, संस्कृीतसोबत चांगले आरोग्य आणि फिटनेससाठी ओळखले जातात.
जापनीस लोक इतके स्लिम आणि फिट का असतात? जाणून घेऊया
जापनीस लोक मासे, समुद्री शेवाळेंसारखे सी फूड्स खातात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण खूप असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यास चांगले असते.
जापनीस लोक जंक फूड टाळतात आणि ऑफिसातही घरचा डब्बा खाण्याला प्राधान्य देतात.
एकावेळी खूप खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने थोडं थोड खातात. यामुळे त्यांचे मेटबॉलिजम वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.
जापानमध्ये चहा पिणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे.ग्रीन टीमध्ये अॅंटीऑक्साइड असतात. जी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
पायी चालणं, सायकल चालवणं अशा शारीरिक क्रिया होणारी लाइफस्टाइल जापनीस लोकं जगतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)