थंडीमुळे सांधेदुखीचा त्रास होतोय? फॉलो करा 'या' टिप्स, वेदना होतील कमी

Feb 27,2024


सांधेदुखी हा त्रास आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही जास्त प्रमाणात दिसून लागले आहेत. तुमच्या आहारामध्ये Vitamin D, Calcium आणि Iron यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते.


आजकाल 30 ते 35 वयोगटातील लोकांनाही सांधेदुखीचा त्रास होतो. अनेकदा लहान मुलांमध्येही या समस्या समोर येत आहेत.


सहसा आपली खराब जीवनशैली सांधेदुखीला कारणीभूत असते कारण आपण बहुतेक वेळ टीव्ही आणि लॅपटॉपसमोर घालवतो, तर मुलेही मैदानात जाण्यापेक्षा ऑनलाइन गेमला जास्त वेळ देत असतात.


हिवाळ्यात आहारातील बदल आणि शारीरिक हालचाली कमी केल्याने वजन वाढू शकते यामुळे गुडघ्यांसारख्या मोठ्या सांध्यावरील भार वाढतो ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते किंवा वाढू शकते. शरीराचे वजन कमी केल्याने वेदना टाळण्यास मदत होते.


दुखणाऱ्या सांध्यांना आराम देण्यासाठी गरम पाण्याची पिशवी किंवा इलेक्ट्रिक हीटिंग पॅडच्या स्वरूपात उष्णता वापरल्याने आराम मिळू शकतो.


गरम पाण्यामुळे अंघोळ देखील स्नायूंना आराम देण्यास मदत करू शकते.जेवणात फक्त तूप, तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल इत्यादींचा वापर करा. या पदार्थांमध्ये हेल्दी फॅट असतात जे सांध्यांसह एकूण आरोग्यासाठी आवश्यक असतात.


नियमितपणे वॉकिंग, स्विमींग आणि योगा केल्यानं शरीराची कोणत्या न कोणत्या रुपानं हालचाल होत रहाते. आपल्या दैनंदिन आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12-आधारित पदार्थांचा समावेश करा.

VIEW ALL

Read Next Story