चण्यात आयर्न, फायबर, फॉलेट, कार्ब्स आणि प्रोटीन असतात त्यामुळे चणे खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे
शरीराला अधिक फायदे मिळण्यासाठी आहारात चण्याचे योग्य पद्धतीने सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.
भिजवलेल्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जर तुम्हाला स्नायूंची वाढ करण्यासाठी जिमला जात असाल आहारात तर मोड आलेल्या चण्यांचा नक्की समावेश करा.
वजन वाढवण्यासाठी भिजवलेले चणे अत्यंत फायदेशीर असतात. भिजवलेल्या चण्यांच्या सेवनाने शरीरातील रक्ताच्या कमतरतेला भरुन काढण्यासोबतच हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.
भाजलेल्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. भाजलेले चणे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात.
भाजलेले चणे खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि कफ पासून आराम मिळतो. तसेच थायरॉईड आणि डायबिटीजने ग्रासलेल्यांनी भाजलेल्या चण्यांचे सेवन करायला हवे.
आरोग्यासाठी भाजलेले आणि भिजवलेले असे दोन्ही प्रकारचे चणे फायदेशीर असतात. आपापल्या गरजेनुसार चण्यांचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)