वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती असावं?

Jan 21,2024

तुम्हाला माहितीये का?

पुरुष कोणत्याही वयात वडील होऊ शकतात का? असा सवाल अनेक तरुणांना पडतो. याबाबतची माहिती पुरूषांना फार कमी प्रमाणात असते.

20 ते 30 वर्षे

तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात.

40 वर्षांनंतर...

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचं वय खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये वडील होण्याची शक्यता कमी होऊ लागते.

स्पर्म डीएनए

पुरुषांमधील स्पर्मचं उत्पादन कधीच थांबत नाही. मात्र वयानुसार, स्पर्मचं डीएनए नुकसान होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते.

न्यूरोडेव्हलपमेंटल

जेव्हा पुरुष मोठ्या वयात पिता होतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका असतो.

स्पर्म पॅरामीटर

स्पर्मची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये हे स्पर्म पॅरामीटर खराब होऊ लागतं.

प्रजनन क्षमता

तज्ज्ञ अनेकांना 35 व्या वर्षात मुलं जन्माला घालण्याचा सल्ला देतात. कारण काही वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते.

VIEW ALL

Read Next Story