पीरियड्सच्या काळात धावपळ केली किंवा अंग मेहनतीची कामं केली, खेळल्यास फ्लोवर परिणाम होतो का? जाणून घेऊयात सत्य...
महिन्यातील मासिक पाळीच्या पाच दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
आज आपण तरुणींबरोबरच शालेय वयातील मुलींना खरोखरच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अधिक धावपळ केल्यास, खेळल्यास फ्लो वाढण्याच्या त्रासाला समोरं जावं लागतं का हे जाणून घेणार आहोत.
वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, धावपळीबरोबरच शालेय वयात मासिक पाळी येणाऱ्या मुलींनी त्या पाच दिवसात मैदानी खेळ खेळले, उड्या मारल्या तर फ्लोवर नक्कीच परिणाम होतो.
अनेकदा खेळांमुळे मासिक पाळीचे दिवस नसतानाही शारीरिक हलचालींचा एवढा परिणाम होतो की कधीतरी पिरीएड्स लवकर येतात.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अधिक शारीरिक हलचाल झाल्यास फ्लो नक्कीच थोडा वाढतो. कारण याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो.
खेळल्याने, उड्या मारल्याने पोट आणि ओटीपोटाजवळच्या पेशींवर ताण पडतो. त्यामुळेच याचा थेट परिणाम फ्लोवर होतो.
अर्थात शारीरिक हलचालींमुळे फ्लोमध्ये होणारे बदल हे मर्यादित कालावधीसाठी असतात. याचा अर्थ सर्वच दिवस फ्लो अधिक राहतो असं म्हणता येणार नाही.
थोडासा व्यायाम आणि नियमितपणे चालल्याने मासिक पाळीत येणाऱ्या क्रम्प्सवर नियंत्रण मिळव्यास मदत होते.
व्यायाम केल्याने एंडोफॉर्मिन नावाचं संप्रेरकाचा स्राव होतो. त्यामुळे मूड चांगला होतो.
मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये फ्लो जास्त असेल तर जास्त व्यायाम करणं टाळलं पाहिजे.
मासिक पाळीच्या काळात येणारा मानसिक तणाव आणि चिडचीड दूर करण्यासाठी खेळांची मदत होते पण दोघांचं संतुलन ठेवलं पाहिजे.
Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.