काळ्या भोर केसांसाठी 'या' तेलाचा वापर नक्की करा

लांब सडक आणि काळेभोर केस म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अकाली केस पांढरे होणं या समस्या स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्ये ही दिसून येत आहे.

अनेक जण पांढऱ्या केसांना कलर करण्यासाठी हेअर डाय वापरतात. मात्र डायमध्ये असलेल्या केमिकलमुळे केसांच्या मुळांवर याचा गंभीर परिणाम होतो.

जर तुमचे ही केस अकाली पांढरे झाले असतील तर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केसांचं आरोग्य सुधारु शकता.

लोखंडाच्या भांड्यात ऑलिव्हऑईल गरम करावं. त्यानंतर त्यात काळी मिरी आणि लवंग टाकावी.

तेल थंड झाल्यावर काचेच्या बॉटलमध्ये भरुन ठेवावं.

आठवड्यातून दोन वेळी या तेलाने केसांच्या मुळांची मालिश करावी.

या तेलाच्या वापराने नैसर्गिकरित्या केस काळेभोर होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story