दारू प्यायल्यानंतर काही काळ तुम्हाला काहीही होत नाही, पण काही काळानंतर दारू पिणाऱ्याचा आवाज आणि वागणूक बदलू लागते.
थोड्या वेळाने व्यक्तीची चाल देखील बदलू लागते आणि त्याचे शरीरावरील नियंत्रण सुटू लागते.
असे का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
आज आपण जाणून घेऊया की अल्कोहोल शरीरात गेल्यावर कोणते बदल होतात आणि त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो?
एका अहवालानुसार, अल्कोहोल प्यायल्याने मेंदूतील हार्मोनवर परिणाम होतो. हे हार्मोन किडनीला जास्त प्रमाणात लघवी तयार करण्यापासून रोखतं.
दारू पिल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. यावेळी यकृत आपले काम नीट करू शकत नाही. विशेष म्हणजे यकृतामध्ये वेदना होत नाहीत.
अल्कोहोल प्यायल्याने यकृत आणि स्वादुपिंडाचं कार्य बिघडू लागते. त्यामुळे दारू पिणाऱ्या व्यक्तीला अॅसिडिटीचा त्रास होतो.